Wednesday, October 27, 2010

रं राम राम पुणेकर !
काय झालं आता ब्लॉग वाच्तुयास म्हंजी पुण्याचाच म्हणायचा कि !  मग आता पुणेकरच कि ...
बरं झालं तू इथं आलास नाही तरी काय या साईट वरन त्या साईट वर हुड्या टाकण्यात कसला आलाय "आयटी"पणा ?
आमच्या अप्पाची मिस्कील मस्करी ! अप्पा म्हंजी पप्पा न्हवं बरं का !
अप्पा म्हंजी पारावरची सर्वात दांडगी गाय .. म्हंजी मोठा माणूस .
अप्पांसाठी युवराज म्हंजी माळरानाचा गडी आन गावरान बंदूक आन त्यात इंग्रजी कार्तुस !

हो गाव आणि तिथला पार , दिलफेक गप्पा आणि आपण वाढलो नाही म्हणून काय खुंटलो  तरी कुठे ?
अश्या अविर्भावात आज हि मैफिल जमते , जो कुणी बाहेर गावी जातो त्याला सगळे सल्ले देतात तसे मलाही
सल्ले देऊन देऊन सगळे सल्ले व सल्ले देण्याची तर्हा मला पुरे पूर अवगत झाली आहे .

सगळे सल्ले गाडीत बसून गावाबाहेर गेले कि पटा पट आठवायला लागतात , जवळची आपली माणस डोळ्या समोरून "ब्लुर्र" पणे सटकतात.
ज्यांनी "जाऊ नको रे" अस प्रेमाने म्हंटल असत त्यांना जवळ जाऊन समजवावं अस वाटत , खरं तर दोन चार अनोळखी माणसं आवती भोवती असले कि
पटकन ओळखीच्या माणसां जवळ जाणारे आपण .. प्रवास आणि पुढे आपल्या ओळखीच कोणीच नाही या कल्पनेनेच "चिंब पावसाने रान झाले बेभान "  होतो .
जेव्हा गावी असतो तेव्हा कसे बिंदास असतो आणि पुण्यात रस्त्यावर पण दोर पायाखाली आन आपण वर ! आपली मर्दाची चाल अन तिथे पुणेरी "काट वाक"!
इथे आपल्या पोरी अन तिथे मोठ्या बाहुल्या !!! आर तिच्या  .....
लिहायला लागलो कि कीबोर्ड घसरला अशी म्हण काढायला हवी अस मला वाटत .
पुण्यात काहीच "उनं" नाही  |
अशी म्हणच इतके रुजली आहे , कित्येक भारत फोर्ग सारख्या कंपनीत कामाला लागले आणि काही इतर फिल्ड मध्ये काम करतायत .
माझी हि अशीच लगबग या दिवाळी साठी चालू होती किती दिवस झाले " पुणे ब्लॉगर्स " माझ्या डेशबोर्ड वर आहे पण लवकर पोस्ट करन जमल नाही .
 हो तुमची चालू आहे न दिवाळी साठी धावपळ तशीच इकडे हि चालू आहे .
पुणे स्टेशन बाहेर ससून हॉस्पिटल जवळचा रस्ता सारखा गजबजलेला आणि पुढे आंबेडकर मार्ग तिथून हडपसर आन थेट गाव. असाच आजवरच माझा प्रवास .
पण आता तिथे राहायचं म्हणजे जरा अतीच होतंय पण ...
विजू म्हणते  फ्री वाय-फाय, रेडू, अन चांगल्या पगारीच काम म्हंटल्यास तू तर जाणारच रे ! इथ काय ढेकूळ ठेवलंय जे तू राहशील ? ज्ज्जा !! ज्जा रे !
मित्र म्हणजे हक्काने इज्जतीचा कचरा करणारे कोपीराईट "होल्डर" ! मी सोडून जाणार हे ऐकून यांच्या "होल्डर" वर लाईटच लागली . आता काय हसतमुखाने जातोय .
पण जेव्हा जवळ येतात आणि परिस्थिती स्वीकार करतात तेव्हा मात्र प्रेमाने एकच विचारतात "विसरून तर जाणार नाहीस ना रे ?"
खूप खूप प्रेम आणि जिव्हाळा भेटतो . आणि वाटत कश्याला जातो आपण गाव सोडून ?
खरं सांगू गावा एवढाच प्रेम पुण्यावर हि आहे पण पुण्यात हि आगाव कार्टी नाहीत ना ? त्यांना मी हि प्रोमीस केल होत कि काहीही झालं तरी एकट पडू देणार नाही .
पण आज दूर जातोय .. घोडाफोन अर्रर .. म्हंजी वोडाफोन अन रिलायंस च्या कृपेने नाईट काल्लींग चालू म्हणून कमीत कमी रडण तरी लपून लापुनच का होईना पण  होत .
मग ज्यावेळी आहो होतो त्यावेळची गम्मत ...
मित्राची आई म्हणत होती " बेटा भार वतन जरा अपनी फिक्र ले ! सीताफळ मीठे लागे हैं बिना खायेच जारा"
कार्टी : युव्या दुबई ला चालला कि काय ? और अम्मा सीताफळ यहा देव इसको " झिप फाईल मी डालके अपलोड कर देतुं " काफे मी बैठ कु खाईंगा.
आणि गडी निघाली ..
                                  चला निघायचं तर ?             भेटत राहूया .....
                                                             राम राम !